पर्म विद्यापीठावर दहशतवादी हल्ला, 8 जणांचा मृत्यू
रशियातील पर्म विद्यापीठात दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. विद्यापीठात अज्ञात हल्लेखोराने अचानक गोळीबार केला. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे वर्ग आणि इमारतीमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी खिडक्या आणि छतावरून उड्या मारत धूम ठोकली. सुरक्षा दलांनी हल्लेखोराला ठार केले आहे. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 14 जण जखमी झाले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार हल्लेखोर 18 वर्षांचा आहे. हल्ला करण्यापूर्वी त्यानं सोशल मीडियावर हल्ल्याची माहिती दिली होती.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक जीव वाचवण्यासाठी छतावरुन आणि खिडकीतून उड्या मारताना दिसत आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
MORE: Unconfirmed reports say the #Perm shooter is an 18-year-old lone-wolf attacker who left a note describing his act on social mediahttps://t.co/gV0sv3xUdE pic.twitter.com/4y12dXum7K
— RT (@RT_com) September 20, 2021
पर्म रशियातील प्रसिद्ध विद्यापीठ आहे. येथे देश-विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. पण आज, अचानक विद्यापीठात गोळ्यांचा आवाज सुरु झाला. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी छतावरुन आणि खिडक्यातून उड्या मारुन पळ काढला. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचं चित्र आहे. व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांची धावपळ दिसत आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, एका अज्ञात हल्लेखोरानं विद्यार्थ्यांवर अचानक गोळ्या झाडल्या. त्यानंतर एकच धावपळ सुरु झाली. इमारतीवरुन विद्यार्थ्यांनी उड्या मारुन जीव वाचवण्यासाठी पळ काढला. सुरक्षारक्षकाने हल्लेखोराला मारलं आहे. मात्र, या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जण जखमी झाले आहेत. पोलिस या घटनेचा शोध घेत आहेत.