देशात २४ तासात नव्या रुग्णांमध्ये ३.७ टक्के वाढ
![In Dadar lab, 12 people were treated in Corona, Mumbai with 683 new patients](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/corona-mutation-e1613720003185-4.jpg)
नवी दिल्ली – देशात शुक्रवारी विक्रमी लसीकरण करण्यात आले असून तब्बल दोन कोटींहून अधिक जणांना लस देण्यात आली. तर गेल्या २४ तासात देशात ३५ हजार ६६२ नवीन रुग्ण सापडले आहेत. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी नव्या रुग्णांमध्ये ३.७ टक्के इतकी वाढ झाली. दिवसभरात ३३ हजार ७९८ जण बरे होऊन घरी परतले. देशात सध्या सक्रीय रुग्णांची संख्या ३ लाख ४० हजार ६३९ इतकी आहे. एकूण बाधित रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १.०२ टक्के इतकं आहे.
देशात दैनंदिन संसर्ग दर हा २.४६ टक्के इतका आहे. गेल्या १९ दिवसांपासून हा दर तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर आठवड्याचा ससंर्ग दर हा २.०२ टक्के असून तो ८५ दिवसांपासून ३ टक्क्यांच्या खाली आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ३२ हजार २२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
गेल्या २४ तासात देशात ३५ हजार ६६२ नवे रुग्ण सापडले असून ३३ हजार ७९८ जण कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात कोरोनामुळे २८१ जणांनी प्राण गमावले. आतापर्यंत देशात ३ कोटी ३४ लाख १७ हजार ३९० जणांना कोरोनाची लागण झाली. तर ३ कोटी २६ लाख ३२ हजार २२२ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत देशात ४ लाख ४४ हजार ५२९ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.