केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण, 24 तासांत 33,376 रुग्ण वाढले
![Kerala and Maharashtra had the highest number of active patients, with an increase of 33,376 patients in 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/383720-corona-logo-2.jpg)
पुणे | देशात गेल्या 24 तासांत 33 हजार 376 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी 25 हजार 010 रुग्ण केरळमध्ये वाढले आहेत. देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या चार लाखांच्या खाली आली असून, सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रात आहेत. केरळमध्ये 2 लाख 38 हजार 201 तर, महाराष्ट्रात 49 हजार 812 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 32 लाख 08 हजार 330 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 23 लाख 74 हजार 497 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 32 हजार 198 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
देशात सध्या 3 लाख 91 हजार 516 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 308 रुग्ण दगावले आहेत, भारतात आजवर 4 लाख 42 हजार 317 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा झाला असून, देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.48 टक्के एवढा आहे.आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 54 कोटी 01 लाख 96 हजार 989 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 15 लाख 92 हजार 135 नमूने तपासण्यात आले आहेत.
भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. आत्तापर्यंत देशात 73 कोटी 05 लाख 89 हजार 688 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 65 लाख 27 हजार 175 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.