Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
विक्रमी लसीकरण; १४.३९ लाख जणांना लस
![रायगडात शिक्षकांच्या लसीकरणाचा गोंधळ; आधी दुर्लक्ष आणि आता शिक्षकांना नोटिसा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/freepressjournal_2020-12_8b283059-f65c-43f0-9e9e-4777a69ed99d_vaccine_data.jpg)
मुंबई |
करोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य शासनाने लसीकरण मोहिमेला गती दिली असून बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत १४ लाख ३९ हजार ८०९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण लस मात्रांची संख्या सहा कोटी ५५ लाखांवर गेली आहे. देशात सर्वाधिक एक कोटी ७९ लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देऊन महाराष्ट्राने देशात विक्रम केला आहे.
राज्यात २१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६५, तर ४ सप्टेंबर रोजी १२ लाख २७ हजार २२४ नागरिकांचे लसीकरण झाले. हा विक्रम बुधवारी मागे टाकण्यात आला. आरोग्य यंत्रणेतील सर्व घटक लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
एक दृष्टिक्षेप…
- ’ १८ पेक्षा अधिक वयोगटातील एक मात्रा घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण : ४८.४६ टक्के
- ’ १८ ते ४४ वयोगटातील एक मात्रा घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण : ३७.८८ टक्के
- ’ ४५ पेक्षा अधिक वयाच्या एक मात्रा घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण : ५२.२४ टक्के