मॉडर्नचे सीमेवर रक्षाबंधन साजरे
![Celebrate Rakshabandhan on the border of Modern](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/WhatsApp-Image-2021-08-25-at-12.10.00-PM-1.jpeg)
पुणे | प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माॅडर्न हायस्कूल शिवाजीनगर पुणे-5 या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सैनिकांना स्वतःच्या हाताने बनविलेल्या राख्या व पत्र आणि क्रांतीकारकांची चित्रे
पाठवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.तसेच प्रशालेतील शिक्षिका वंदना सोनोने ,सुनिता शिरसाट यांनी राक्षाबंधनाचा कार्यक्रम सीमेवरील कारगिल वाॅर मेमोरियल या ठिकाणी सैनिकांना राख्या बांधून प्रत्यक्ष साजरा करण्यात आला तसेच सैनिकांसाठी मानपत्र चे वाचन करून समर्पित करण्यात आले .संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.गजानन एकबोटे म्हणाले,
बहिण भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन.देशातील जनतेच्या संरक्षणार्थ सीमेवर अहोरात्र कडक पहारा देणाऱ्या भारत भूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांचे राखीच्या धाग्याच्या प्रतिका द्वावारे कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अल्पसा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या मनात सैनिकांविषयी अभिमान,संवेदनशीलता व समाजभान जागृत करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल ,सहकार्यवाह व पुणे म.न.पा. नगरसेविका प्रा.ज्योत्स्ना एकबोटे,शाळा समिती अध्यक्ष चित्तरंजन कांबळे,प्रशालेच्या मुख्याध्यापिका छाया आंधळे,उपमुख्याध्यापिका शारदा साबळे,पर्यवेक्षिका सीमा कुळधरण यांनी कौतुक केले. प्रमोद शिंदे,दादाभाऊ शिनलकर, खंडू खेडकर यांचे विशेष सहकार्य लाभले.