रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवल्या प्रकरणी वाकड पोलिसांची दोन बारवर कारवाई
![Wakad police take action against two bars for keeping the bar open till late at night](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/drink-menu-hack-e1629167170209-1.jpg)
पिंपरी चिंचवड | रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी दोन अस्थापनांवर कारवाई केली. यामध्ये 23 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.बार मालक निरज नेवाळे याने 18 डिग्री बार अँड लॉंज रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. बार मालक आणि स्टाफ अशा 14 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून एक लाख 400 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच 105 ग्राहकांविरुध्द विनामास्क कारवाई करुन 52 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दुसरी कारवाई स्पॉट 18 मॉल येथे योलो बार अँड रेस्टो या बारमध्ये करण्यात आली. बार मालक समीर वाघज व स्टाफ अशा नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 74 हजार 220 रोख रक्कम जप्त करून 113 ग्राहकांविरुध्द विनामास्कची कारवाई करून त्यांच्याकडून 56 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.