व्यापाऱ्यांच्या समस्या सीएंनी शासनदरबारी मांडाव्यात – फत्तेचंद रांका
पिंपरी चिंचवड | कोरोनाच्या काळात राज्यातील व्यापारी बऱ्याच समस्यांना सामोरे जात आहेत. व्यापाऱ्यांच्या समस्या सनदी लेखापाल यांनी प्रशासन दरबारी मांडाव्यात. जेणेकरून समस्या मार्गी लागेल. अशी अपेक्षा पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी निगडी येथे व्यक्त केले.स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आयसीएआय पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने झेंडा वंदन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रांका यांच्या हस्ते आयसीएआय निगडी येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आयसीएआय, पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष सीए चंद्रकांत काळे, उपाध्यक्ष सीए विजयकुमार बामणे, सचिव तथा कोषाध्यक्ष सीए शैलेश बोरे, माजी अध्यक्षा सीए सिमरन लिलवानी, सीए संतोष संचेती, सीए पंकज पाटणी, माजी अध्यक्ष सीए सुहास गार्डी, सीए किशोर गुजर, सीए विकी बलाणी, सीए मंदार देशपांडे, सीए महेंद्र बोराडे, सीए विजयकुमार गुट्टे, सीए केदार कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा भिसे यांनी तर आभार विजयकुमार बामणे यांनी मानले.





