घरकुल योजनेच्या प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना स्वहिस्सा भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
![Extension till 31st August for payment of self share to the beneficiaries of waiting list of Gharkul scheme](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Gharkul-pimpri-1.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या से.क्र. 17 व 19 चिखली येथील जागेवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासांठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. यासाठी निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी 31 ऑगस्ट 21 पर्यंत मुदतवाढ देण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली.
या मुदतीमध्ये स्वहिस्सा रक्कम न भरणा-या लाभार्थ्यांचे नाव निवड यादीतून रद्द करण्यात येईल, असे आयुक्त पाटील यांनी सांगितले. स्थायी समिती सभेने 31 ऑगस्ट 2021 पर्यंत लाभार्थ्यांना स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिली होती. या योजनेमध्ये 23 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या संगणकीय सोडतीमधील प्रतिक्षा यादीमध्ये असलेल्या प्रवर्गानिहाय 456 लाभार्थींना घरकुल योजनेमध्ये स्वहिस्सा रक्कम भरणेकामी मान्यता देण्यात आलेली आहे. संबंधित लाभार्थींनी प्रथम स्वहिस्सा 50 हजार रुपये, उर्वरीत स्वहिस्सा 3 लाख 26 हजार असे एकूण 3 लाख 76 हजार रुपये भरण्यासाठी 31 जुलै 21 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
त्यामधील प्रथम स्वहिस्सा रक्कम भरणा करणाऱ्या लाभार्थींना उर्वरीत स्वहिस्सा भरणेकामी व ज्या लाभार्थींनी प्रथम व उर्वरीत स्वहिस्सा रक्कम भरलेली नाही अशा लाभार्थींना स्वहिस्सा रक्कम भरणा करण्यासाठी 31 ऑगस्ट 31 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हि अंतिम मुदतवाढ असून यानंतर निवड झालेल्या या लाभार्थ्यांची यादी महापालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php या संकेतस्थळावर तसेच झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग, चिंचवड येथे पाहण्यास उपलब्ध आहे.