भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवले, वंदना कटारियाची हॅटट्रिक
![Indian women's hockey team beats South Africa, Vandana Kataria's hat trick](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/HOCKY-.jpg)
टोकिया – टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. महिला हॉकी संघाने ४-३ असा हा सामना जिंकला. आज सायंकाळी आयर्लंड विरुद्ध ब्रिटन यांच्यामध्ये सामना होणार आहे. यामध्ये आयर्लंडचा पराभव झाल्यास भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरी गाठेल.
आर्यलंडचा पराभव करीत महिला हॉकी संघाने स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले होते. आज दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा सामना महत्त्वपूर्ण होता.आज विजयाच्या निर्धाराने भारतीय हॉकी संघ मैदानात उतरला. दोन्ही संघानी उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन केले.
वंदना कटारिया हिने सुरुवातीला गोल नोंदवत भारताला आघाडी मिळवून दिली. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन केले. तिसर्या हाफमध्ये दोन्ही संघ तीन-तीन अशा बरोबरीत होते. अखेर चौथ्या हाफमध्ये वंदना कटारिया हिने निर्णायक गोल नोंदवत भारताचा विजय निश्चित केला.
वंदना कटारियाची हॅटट्रिक
‘वंदना कटारिया हिने आज तीन गोल केले. ऑलिम्पिकच्या सामन्यात हॅटट्रिक नोंदवणारी वंदना पहिली खेळाडू ठरली आहे.