उत्तराखंडमधील ६ वी ते १२ वीचे वर्ग २ ऑगस्टपासून सुरू होणार
![Classes 6th to 12th in Uttarakhand will start from 2nd August](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/school.png)
देहरादून – उत्तराखंडच्या शाळांमधील ६ वी ते १२ वीचे वर्ग १ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १ ऑगस्टपासून उत्तराखंडमधील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. मात्र १ ऑगस्टला रविवार असल्यामुळे शाळा २ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.
राज्यातील ६ वी ते १२ वीचे वर्ग १ ऑगस्टपासून सुरू होणार असले तरी कोरोनाचे सर्व नियम काटेकोर पाळण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. या शाळा प्रत्यक्ष २ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. उत्तराखंड लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आर्थिक दुर्बल घटकातील परीक्षार्थींना ५० हजारांची आर्थिक मदत देण्याचाही निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला आहे. याशिवाय २३ ते २७ ऑगस्ट दरम्यान पावसाळी अधिवेशन होणार आहे.