ज्याला लोक “रामराज्य” समजतात, ते तर “रामभरोसे” राज्य- रुपाली चाकणकर
उत्तर प्रदेश |
समाजवादी पक्षाच्या एका महिला उमेदवाराची साडी खेचण्याचा प्रकार घडल्यामुळे शुक्रवारपासून उत्तर प्रदेशमध्ये मोठा गदारोळ सुरू आहे. सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या भाजपा सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. सोशल मीडियावर देखील यासंदर्भात नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील योगी सरकारवर निशाणा साधला आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या, “ज्याला लोक “रामराज्य” समजतात ते खरं तर “रामभरोसे” राज्य आहे. रामभरोसे राज्यात असलेल्या आंधळ्या सरकारमुळे तिथे कायदा आणि सुव्यवस्था नावालाही शिल्लक नाही. सीतेची ही हतबलता तिथे रोजचीच आहे.”
ज्याला लोक "रामराज्य" समजतात ते खरं तर "रामभरोसे" राज्य आहे. रामभरोसे राज्यात असलेल्या आंधळ्या सरकारमुळे तिथे कायदा आणि सुव्यवस्था नावालाही शिल्लक नाही. सीतेची ही हतबलता तिथे रोजचीच आहे. pic.twitter.com/Fvt3vZCh1H
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 9, 2021





