Breaking-newsमनोरंजन
ज्युलिया रॉबर्ट्सची इन्स्टाग्रामवर धडाक्यात इंट्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/julia-.jpg)
लॉस एंजेलीस :जगप्रसिद्ध हॉलीवुड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्टसने पहिल्यांदाच सोशल मिडीयावर आपला फोटो अपलोड केला आहे. ५० वर्षीय ज्युलिया रॉबर्टसने ‘लव्ह’ ही अक्षरे लिहलेला काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम घातलेला फोटो टाकुन त्याला ‘हॅलो’ हे कॅप्शन दिले आहे.
ऑस्कर विजेत्या या अभिनेत्रीचे काही तासांमध्येच २ लाख २६ हजार फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर झाले आहे. परंतु सध्या तरी तिने कोणालाही फॉलोबॅक केलेला नाही. २०१३ च्या एका मुलाखतीमध्ये ती असे म्हणाली होती की, या सोशल मिडीयापासुन मी जरा लांबच राहणे पसंद करेन , कारण माझ्या कामाव्यतीरिक्त राहिलेला वेळ मला माझ्या कुटुंबियांसाठी घालवायचा आहे.