मुंबईत आज केवळ तीन तास लसीकरण; कधी? जाणून घ्या
![Re-scarcity of ‘covishield’; Only the covacin vaccine will be available on Thursday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/914328-corona-vaccine-1.jpg)
मुंबई – मुंबईत आज दुपारी २ ते संध्याकाळी ५ केवळ या तीन तासांच्या वेळेतच लसीकरण केले जाणार आहे. मर्यादित लसीकरण केंद्रांवर हे लसीकरण होणार असून कोविशिल्ड ही लस केवळ ४५ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना दिली जाणार आहे, तर कोवॅक्सिन लस केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांनाच दिली जाईल. तसेच मुंबईतील काही केंद्रांवर १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण आज होईल मात्र दुपारी २ ते संध्याकाळी ५ या वेळेतच.
दरम्यान, लसीकरणाचे नवे धोरण लागू झाल्यापासून केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात लससाठा प्राप्त होत आहे. मुंबईलाही जूनच्या शेवटच्या आठवड्यात लसींचा पुरेसा साठा मिळाला होता. त्यामुळे पालिकेच्या केंद्रांवर प्रतिदिन लसीकरणाची संख्या २० ते ३० हजारांवरून अगदी ८० ते ९० हजारांपर्यंत गेली. मात्र मागील चार दिवसांपासून पुन्हा लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने बुधवारी पालिकेच्या केंद्रांवर केवळ २५ हजार जणांचे लसीकरण होऊ शकले. तर पालिकेच्या लसीकरण केंद्रांतील साठा बुधवारी पूर्णपणे संपल्याने गुरुवारी लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आली होती. त्यानंतर आज तीन तास लसीकरण सुरू राहणार आहे.