सिद्धेश्वर एक्सप्रेस १ जुलैपासून सुरू होणार, रेल्वे विभागाचा निर्णय
सोलापूर – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक एक्सप्रेस गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, आता या रेल्वे गाड्या हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. त्यातच, १ जुलैपासून सिद्धेश्वर एक्सप्रेस सुरू होणार आहे. रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला असून सोलापूर विभागातून ३० विशेष एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहेत.
सोलापूर-मुंबई या मार्गावर सिद्धेश्वर एक्सप्रेस धावते. सोलापूरवरुन हजारो नागरिकांची आपल्या कामानिमित्त राजधानी मुंबईला ये जा असते.तसेच मुंबईमधूनही सोलापूरला येणारे नागरिक मोठ्या संख्येने आहेत. मात्र कोरोना काळात ही गाडी बंद करण्यात आली होती. आता या गाडीच्या सर्व प्रवाशांसाठी रेल्वे विभागाने चांगली बातमी दिली आहे.
नव्याने सुरू होणार्या या रेल्वे गाड्यांमध्ये पुणे- नागपूर- पुणे विशेष एक्सप्रेस, मुंबई- लातूर- मुंबई विशेष एक्सप्रेस, सोलापूर- मुंबई- सोलापूर या गाड्यांचा समावेश आहे.तसेच इंद्रायणीसह ११ रेल्वे जुलै महिन्यापासून सुरु करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्सप्रेस ला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. तर जनशताब्दी एक्सप्रेस ही लवकरच सुरु होणार आहे.