मनसुख हिरेन प्रकरणात नवं वळण; एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचा छापा
![New turn in Mansukh Hiren case; NIA raids encounter specialist Pradeep Sharma's house](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/pradeep-sharma-and-parambir-.png)
मुंबई – एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने छापा टाकला आहे. मनसुख हिरेन प्रकरणात निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी प्रदीप शर्मा हे एनआयएच्या रडारवर होते. आज सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या अंधेरी येथील घरी एआयएने छापा मारला आहे. साडेतीन तासापासून त्यांची चैाकशी सुरु आहे. निवृत्त पोलिस अधिकरी प्रदीप शर्मा यांची यापूर्वीही सलग दोन दिवस याप्रकरणी चैाकशी झाली आहे. त्यावेळी शर्मा यांच्या मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला होता.
या प्रकरणात नुकतीच NIA नं संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक केली होती. संतोष हा शर्मांच्या जवळचा व्यक्ती असल्याचं बोललं जातं, बुधवारी पीएस फाऊंडेशनच्या दोघा जणांनाही NIA नं चौकशीला बोलावलं होतं. या प्रकरणात विनायक शिंदे आणि वाझे यांची अंधेरीत बैठक झाल्याचं बोललं जातं, त्यावेळी माजी पोलिस अधिकारी उपस्थित असल्याचं सांगितलं जातं. शर्मा यांनी ३९२ गुंडांचा एन्कांऊटर केला आहे.