वाकडमध्ये साकारले I ❤️ WAKAD… MY WAKAD, SMART WAKADचे आकर्षक सेल्फी पॉईंट!
![I ❤️ WAKAD… MY WAKAD, SMART WAKAD's attractive selfie point realized in Wakad!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/f2ee2ebc-19bf-400e-bb01-f64af6d0dda4.jpg)
- वाकडच्या सौंदर्यात भर; स्मार्ट प्रभागाकडे वाटचाल- नगरसेविका ममता गायकवाड
वाकड / महाईन्यूज
MY WAKAD, SMART WAKAD हे व्हिजन ठेवून वाकड परिसरात पिंक सिटी रस्ता येथे सुशोभीकरणच्या दृष्टीने सेल्फी पॉंईट साकारण्यात आला आहे. संपूर्ण वाकड परिसराचा विकास करीत असताना नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळाल्याच पाहिजेत परंतु, सुसज्ज व स्मार्ट परिसरामध्ये देखील हा परिसर मागे पडता कामा नये, या दृष्टीकोनातून आ. लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका ममता विनायक गायकवाड यांच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कामे मार्गी लावली आहेत.
माजी नगरसेवक विनायक गायकवाड म्हणाले, “पिंपरी चिंचवड शहरातील अनेक अत्याधुनिक प्रकल्प या वाकड परिसरात राबवत आहे. त्यात प्रभागातील सिमेंट काँक्रीट रस्ते, पाण्याची टाकी, सुशोभीकरण, क्रीडा संकुल, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, फुटबॉल टर्फ मैदान, लिनियर गार्डन व इतर कामे होत आहेत. यामुळे नक्कीच आपला वाकड परिसर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्मार्ट प्रभाग म्हणून नावारूपास येईल.”