breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पार्थ पवार सोशल फाऊंडेशनच्या वतीने कोविड रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेचे उद्या लोकार्पण
- नगरसेवक राजू बनसोडे यांनी घेतला पुढाकार
पिंपरी / महाईन्यूज
पार्थ पवार सोशल फाऊंडेशन आणि नगरसेवक राजू बनसोडे यांच्या सौजन्याने कोरोना महामारीच्या काळात रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. कोविड काळात या रुग्णवाहिकेचा रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.
हा कार्यक्रम दापोडीतील नगरसेवक राजू बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालय (सीएमई गेट) येथे बुधवारी (दि. 12) सकाळी दहा वाजता घेण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक योगेश बहल, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, फजल शेख आदी उपस्थित होते.