Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

पेट्रोल 26 पैशांनी, तर डिझेल 31 पैशांनी महागले

 

मुंबई – सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या इंधन दरवाढीचे सत्र सुरूच आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 26 पैशांनी वाढून 98.12 रुपयांवर पोहोचली आहे, तर डिझेलची किंमत 31 पैशांनी वाढून 90 रुपयांवर पोहोचली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत 27 पैशांची वाढ झाली असून ते 92 रुपयांवर पोहोचले आहे, तर डिझेलच्या किंमतीत 30 पैशांनी वाढ होऊन ते 82.36 रुपयांवर पोहोचले आहे.

पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर तेल कंपन्यांनी दरात मोठी वाढ सुरू केली. आठवडाभरात पेट्रोल लिटरमागे १ रुपया १४ पैसे, तर डिझेल दर १ रुपया ३३ पैशांनीवाढला आहे. दरम्यान, इंधनाच्या किंमती या राज्यांनुसार वेगवेगळ्या असतात. त्यात मूल्यवर्धित कर व वाहतूक कर आकारले जात असल्याने दरवाढ वेगवेगळी असते.

देशातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर
मुंबई
पेट्रोल – 98.12 रुपये/लिटर
डिझेल – 89.48 रुपये/लिटर

दिल्ली
पेट्रोल – 91.80 रुपये/लिटर
डिझेल – 82.36 रुपये/लिटर

कोलकाता
पेट्रोल – 91.92 रुपये/लिटर
डिझेल- 85.20 रुपये/लिटर

चेन्नई
पेट्रोल – 93.62 रुपये/लिटर
डिझेल- 87.25 रुपये/लिटर

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button