दापोलीत पोस्ट ऑफीसमध्येच महिला कर्मचारीने लावला गळफास
![A female employee hanged herself at the post office in Dapoli](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/sucide_2017082133-1.jpg)
रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत जाताना दिसते आहे. दापोली तालुक्यातील मुरुडमध्ये एका पोस्ट ऑफिसमध्ये महिला कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. पूर्वी तुरे असं त्यांचं नाव असून त्या रात्री उशिरापर्यंत घरी पोचल्या नसल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. तेव्हा त्यांनी पोस्ट ऑफिसमध्येच गळफास लावल्याचे निदर्शनास आले.
पूर्वी तुरे या विवाहित होत्या. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास पतीला पोस्टात कामानिमित्त जात असल्याचं सांगितलं. सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. पूर्वी यांच्या पतीने शोध सुरु केला. रात्री 10 च्या सुमारास त्यांना मुरुड पोस्ट कार्यालय आतून बंद असल्याचं निदर्शनास आलं. खिडकीतून पाहिलं असता पूर्वी यांनी गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पूर्वी यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.