breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईत 6,123, पुण्यात 6,591 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे अतिशय आवश्यक आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात 35,726 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 166 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 14,523 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 26,73,461 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 54,073 इतका झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 23,14,579 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 3,03,475 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात तब्बल 6,123 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 2,294 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,91,751 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,641 इतका झाला आहे, तर आतापर्यंत मुंबईत 3,37,555 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 41,609 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यात शनिवारी तब्बल 6,591 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5.08 लाखांवर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 14 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 8,318 इतका झाला आहे. तसेच पुण्यात आतापर्यंत 4.42 लाख जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 56,849 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button