Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

शनाया करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; करण जोहर करणार लॉन्च

मुंबई – बॉलिवूड निर्माता करण जोहर याने आजपर्यंत बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड्सला लॉन्च केले आहे. आता तो आणखी एक स्टार किड पडद्यावर घेऊन येणार आहे. ही स्टार किड आहे अभिनेता संजय कपूर याची मुलगी शनाया कपूर आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबाबत करण जोहरने ही माहिती दिली आहे.

करण जोहर आपल्या धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सीच्या माध्यमातून नवीन चेहऱ्यांची ओळख करून देतो. आता शनाया लवकरच धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून तिचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. जुलै महिन्यात हा चित्रपट येणार असल्याचे वृत्त आहे. धर्मा प्रोडक्शनने ट्विटर हॅण्डलवरही शनायाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. शनाया लवकरच पडद्यावर पदार्पण करणार असल्याची माहिती ट्विटमधून देण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button