Breaking-newsपुणेमहाराष्ट्र

आरटीओत बसवणार स्मोक डिटेक्‍टर

पुणे – सलग दोन वेळा लागलेल्या आगीच्या घटनांमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) प्रशासनाला चांगलीच जाग आली आहे. दोन घटनांमुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने इमारतीचे फायर ऑडीट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता स्मोक डिटेक्‍टर बसवण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

गेल्या आठवड्यात दि. 13 आणि 17 जूनला लागोपाठ दोनवेळा आरटीओ कार्यालयातील कागदपत्रांना आग लागल्याच्या घटना घडल्या. यामुळे कार्यालयातील सुरक्षेचा प्रश्‍न समोर आला होता. यानंतर प्रशासनाने इमारतीचे फायर ऑडीट करण्याचा निर्णय घेतला. तशा स्वरुपाचे पत्र संबंधित विभागाला पाठवण्यात आले आहे. यानंर पुढचे पाऊल म्हणून आता प्रशासनाने कार्यालयात स्मोक डिटेक्‍टर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी आरटीओ कार्यालयाच्या इमारतीचा सर्व्हे देखील करण्यात आला आहे. आरटीओतील अनके विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे आहेत. यामुळे स्मोक डिटेक्‍टर तातडीने बसविण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group