मुळशी तालुक्यासाठी रूग्णवाहिका घेण्यासाठी ११ लाख रुपये देणार – डॉ नीलम गोऱ्हे
![Munshi Talukyasathi Rugnavahika Gheenyasathi 11 Lakh Denaar - Dr. Neelam Gole](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/nilam.jpg)
पुणे । प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम आहे.यामध्ये शासन स्तरावरून मदत करण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. मुळशी तालुक्यासाठी संयोजकांच्या विनंती नुसार ११ लाख रुपये स्थानिक विकास निधीतून अपंगांच्या शाळेसाठी किंवा रूग्णवाहिकेसाठी देणार असल्याचे आश्वासन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
मावळ तालुक्यातील माले गावात तहसीलदार कार्यालय मावळ व जिल्हाधिकारी पुणे यांचे वतीने महाराज्यस्व अभियाना अंतर्गत शासन आपल्या दारी योजनेमध्ये मावळ तालुक्यात शासनाच्या विविध विभागाचे १५ प्रकारचे दाखले वाटप कार्यक्रम घेणेत आला. त्याचे उदघाटन करताना प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ नीलम ताई गोऱ्हे बोलत होत्या. या वेळी तहसीलदार अभय चव्हाण, प्रांत अधिकारी संदेश शिर्के, जिल्हाधिकारी पुणे तसेच युवसेना जिल्हाप्रमुख अविनाश बलकवडे, शिवसेना जिव्हाप्रमुख रमेश कोंडे, स्वाती ढमाले व मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक हजर होते.
कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात जाऊन त्यांना आवश्यक असणारे दाखले मिळविणे शक्य झाले नाही. त्यामुळे या अभियानाला खूप महत्व आहे. सामान्यांना एकाच छताखाली हे दाखले तात्काळ मिळण्याची सोय झाली आहे. दाखलेही तात्काळ मिळत आहेत. यासाठी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे आणि जिल्हाधिकारी पुणे यांचे सहकार्य राहीले.