बांधकाम कामगारांना लवकरच लाभ मिळवुन देऊ
![Bandhak kamgarana lavarkarach benefit miwun deu](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/mumbai-baithak.jpg)
– कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव सी. श्रीरंगम यांचे आश्वासन
– कामगारांच्या प्रश्नावर मुंबईत बैठक
पिंपरी । प्रतिनिधी
नवीन प्रक्रियेने कामकाज सुरू असून सध्या येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव सी. श्रीरंगम यांनी दिले.
महाराष्ट्रातील कामगारांना लाभ देण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी व तक्रारीचे सध्या स्थितीत उपाय करण्यासाठी विविध जिल्हा प्रतिनिधी सोबत मुंबई कामगार आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या वेळी आश्वासन देण्यात आले.
या वेळी कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव सी. श्रीरंगम , राष्ट्रीय वेतन आयोगाचे सदस्य चंदन कुमार , कॉम शंकर पुजारी,कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते सुनील पाटील, गणेश तडाखे, कॉ .रमेश जाधव, वनिता बाळेकुंद्री, लता नाईक, कमलेश आवळे आदी उपस्थित होते.
करोना काळातील आर्थिक लाभ म्हणून उर्वरित बांधकाम कामगारांना मिळणार होते. ते अद्याप मिळालेले नाहीत. ते देण्यात यावेत. संगणकावर अर्ज भरण्यात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे साध्या पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात यावे. टाळेबंदी मुळे अनेक कामगारांना नूतनीकरण व इतर लाभासाठी अनेक समस्या येत असून सदरचा कालावधी एक वर्ष पुढे सवलत वाढवून देण्यात यावी. कोर काळातील भरपाई म्हणून लाभात वाढ करावी अशा विषयावर चर्चा झाली.
उपस्थित प्रतिनिधीना संगणक प्रणाली फलकावर माहिती दाखवण्यात आली. त्यानंतर अर्ज स्वीकृतीबाबत अहवाल व सद्यस्थितीबाबत प्रतिनिधीना सांगण्यात आली.