अमित शहांचा कोकण दौरा भाजप कार्यकर्त्यांसाठी माईल स्टोन
![The country's economy will be the fastest in the world in 2021-22 - Amit Shah](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/amit-shah-.jpg)
सावंतवाडी – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह येत्या 6 फेब्रुवारीला कोकणाच्या दौऱ्यावर येणार आहेत. भाजप खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे सिंधुदुर्गचे भाजप नेते अतुल काळसेकर यांनी म्हटले आहे.
वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,07,77,284 वर
पडवे येथील मेडीकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी येणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अर्धा तास कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.त्यां च्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी माईल स्टोन आहे असा विश्वास सिंधुदुर्गचे भाजपा नेते अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी द्यावी अशी आमची आग्रही मागणी आहे.अमित शहा यांच्या कार्यक्रमात आम्ही तशी पक्षाच्या नेत्यांकडे मागणी करणार असल्याचे काळसेकर यांनी सांगितले. यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष संजु परब,नगरसेवक मनोज नाईक,उदय नाईक,मोहीनी मडगावकर आदी उपस्थित होते.
काळसेकर म्हणाले, मेडीकल कॉलेजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या नियोजनाची जोरदार तयारी सुरू आहे. ते सुमारे अर्धा तास ते कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.