नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार, प्रदेशाध्यक्षपद जवळपास निश्चित ?
![There is no formula for the post of Chief Minister - Nana Patole](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/nana-patole.jpg)
मुंबई – महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलणार अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपद सोडणार असल्याची चर्चा आहे. तर त्यांच्या जागी सुनील केदार, वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि नाना पटोले यांची नावे चर्चेत आहेत.मात्र इतर सर्व नावांमध्ये प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोलेंचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला जाणार असल्याचे देखील सांगितले जाते. त्यामुळे या पदासाठी नाना पटोलेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाला का ? अशी चर्चा आहे.
वाचा :-राज्यातील शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करा, राजू शेट्टींची मागणी
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे नव्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात सगळे अधिकार दिलेले आहेत. नुकतीच त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत काँग्रेस मंत्र्यांची आणि महत्त्वाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. पंरतु, या बैठकीनंतही कोणताही निर्णय झाला नाही.आता नाना पटोले पक्षश्रेष्ठींची दिल्लीत भेट घेणार असल्याने लवकरच प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.