देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,05,81,837 वर
![In India, 1,03,558 new corona patients a day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/coronavirus-e-chernobyl-2.jpg)
- 24 तासांत 10,064 नवे रुग्ण
नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटीच्या पार गेल्याने चिंता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापली काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातच देशात मागील 24 तासांत 10,064 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 137 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,05,81,837 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,52,556 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 17,411 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,02,28,753 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 2,00,528 जण कोरोनावर उपचार घेत
वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,92,683 वर
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. परंतु आता मात्र दिवसेंदिवस दिवसभरातील रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. तरी देशातील एकूण रुग्णसंख्या 1 कोटीच्या पार गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केल्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.