राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,92,683 वर
![# Covid-19: Worrying! 1,52,879 positive patients were found in the country in 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/coronavirus-1200x675-1.jpg)
- मुंबईत 395, पुण्यात 298 नवे रुग्ण
मुंबई – देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे सोमवारी आढळलेल्या 1,924 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 19,92,683 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 3,854 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 35 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 18,90,323 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 50,473 वर पोहोचला आहे. तर सध्या 50,680 रुग्ण उपचार घेत आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत सोमवारी कोरोनाचे 395 नवे रुग्ण आढळले, तर 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,03,148 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,242 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 481 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,84,331 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 6,676 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
त्याचबरोबर सुरुवातीला दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 298 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,73,317 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,961 इतका आहे. तसेच काल दिवसभरात 361 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,59,269 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळल्या 298 नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 121, पिंपरी-चिंचवडमधील 87 आणि ग्रामीण भागातील 75 रुग्णांचा समावेश आहे.