धनकवडीत साखर वाटून राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी
पुणे | प्रतिनिधी
सुप्रभात योग साधना केंद्र, धनकवडी व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची 423 वी ‘जयंती’ साजरी करण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शालिनी शिंदे, सुषमा साळुंखे, सोनाली जगताप, शोभा नलावडे, कविता ढेणे, योगशिक्षक सुनील भालेराव, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, भिकाजी साळुंखे, स्वप्नील कोंडे, प्रफुल्ल कुंभार आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे संयोजन शालिनी संतोष शिंदे यांनी केले. तर आभार सोनाली जगताप यांनी मानले. सर्वांना ‘साखर वाटून’ जिजाऊ जन्मोत्सव आनंदाने साजरा करण्यात आला.
या वेळी संतोष शिंदे म्हणाले की, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांना अभिप्रेत असणारे ‘शिवराज्य’ जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. बाल शिवबाला घेऊन त्यांनी स्वकर्तुत्वावर पुर्ण केले. या देशाला दोन ‘छत्रपती’ दिले त्यांनी. या देशाचा इतिहास भुगोल बदलला याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. ‘जिजाऊ’ जयंतीच्या निमित्ताने यापुढे सर्वांचे आरोग्य चांगले ठेवून निर्व्यसनी, चारित्र्य संपन्न ठेवण्याचा आदर्श घ्यावा लागेल. त्यासाठी योग साधनेचा आधार घ्यावा लागेल.