TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजपात ‘आपडा-झापडा’ चा मुकाबला

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपसह आता शिवसेनेनेही तयारी सुरू केली आहे. शिवसेनेने मुंबईतील गुजराती समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. तसेच त्यांच्या भाषेतून टॅगलाइन लिहून त्यांना साद घालण्याचा प्रयत्न देखील केला आहे. यावरच भाजप नेत्यांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेने आत्मविश्वास गमावला, म्हणून त्यांना खमंग ढोकळा आठवला, अशी खरमरीत टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहे. या मेळाव्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे.

आता शिवसेना मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कामाला लागली आहे. त्यासाठी शिवसेनेने फक्त मराठी मतदारांवर अवलंबून न राहता मुंबईच्या कॉस्मोपॉलिटीन मतदारांना साद घालायचे ठरवले आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

जिलबी अने फाफडा, जनाब सेनेला द्या झापडा, अशी भूमिका गुजराती मुंबईकरांनी आता घेतली आहे, अशी खरमरीत टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button