‘कोरेगाव भीमाला जाणारच’, चंद्रशेखर आझाद यांचा निर्धार
मुंबई – भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद सध्या तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. 30 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत या भागात जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे. 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभचं देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण सुरू राहणार आहे.
मात्र असे असले तरी चंद्रशेखर आझाद यांनी कोरेगाव भीमाला जाणारच असा इशारा दिला आहे. कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी जायचे आहे, मात्र सरकारने परवानगी दिली नाही कोरेगाव भीमा येथे जाण्यासाठी न्यायलयात जाण्याची गरज लागली तर न्यायालयात जावू, असे आझाद यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षी तुरुंगात असल्यामुळे येता आले नाही. मात्र, यावर्षी कोणत्याही परिस्थिती कोरेगावा भीमाला जाणार असल्याचे चंद्रशेखर आझाद म्हणाले.