breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
बहुजन समाज पार्टी शहराध्यक्षपदी सुरज गायकवाड
पिंपरी | प्रतिनिधी
बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी सुरज चंद्रकांत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे येथील आंबेडकर सांस्कृतिक भवन येथील बहुजन समाज पार्टीचे संघटन बांधणी मेळाव्यात प्रदेश प्रभारी प्रमोद रैना व प्रदेशाध्यक्ष ऍड. संदिप ताजणे यांच्या हस्ते सुरज गायकवाड यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
गायकवाड हे गेल्या साडेतीन वर्षांपासून बसपा मध्ये सक्रीय पणे कार्यरत आहेत. तसेच त्यांनी 2017 मध्ये महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 13 निगडी परिसरातून लढविली आहे. आठ ते दहा वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरातील फुले शाहू आंबेडकर चळवळीत ते सक्रिय पणे काम करीत आहेत. त्याची दाखल घेत पक्षाच्या वतीने त्यांची नियुक्ती करण्यात आली.