Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उद्यापासून बॅकलॉग परीक्षा

सुमारे पावणेतीन लाख विद्यार्थी देणार परीक्षा

पुणे |महाईन्यूज|

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग आणि श्रेणी सुधार परीक्षा दि. 8 डिसेंबरपासून सुरू होत आहे. ही परीक्षा “प्रॉक्टर्ड’ पद्धतीने होणार आहेत. यासाठी विद्यापीठाची यंत्रणा सज्ज झाली आहे.

विद्यापीठाच्या दि. 8 ते 23 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष पूर्व विद्यार्थ्यांच्या विषय राहिलेल्या (बॅकलॉग) आणि श्रेणी सुधार परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाला लॉकडाउनमुळे वेळ मिळाल्याने, अनेक विषयांच्या परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे. ऑनलाइन परीक्षांचा अंदाज येण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सराव परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली आहे. या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉइस क्वेश्चन म्हणजेच एमसीक्यू) पद्धतीने होणार आहे.

विद्यापीठाने ऑक्टोबरमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने घेतल्या होत्या. त्यावेळी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता या अडचणींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. जवळपास पावणेतीन लाख विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button