एचए गोळीबारप्रकरणी अॅड. सुशिल मंचरकर अटकेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/fa6e735c83aec4ca3dac50669a18935e_XL.jpg)
पिंपरी – हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी वसाहतीमध्ये (एचए) एका महिलेवर झालेल्या गोळीबार प्रकरणी अॅड. सुशील मंचरकर याला शुक्रवारी (दि.15) सायंकाळी भोसरीतील गवळीमाथा याठिकाणी अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली असून सुशील मंचरकर हे राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती आहेत.
गेल्या शनिवारी एक 35 वर्षीय महिलेवर एच. ए कॉलनीत अज्ञातांनी गोळीबार झाला होता. याप्रकरणी मंचरकर यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वी देखील फिर्यादी महिलेने मंचरकर विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. शनिवारी फिर्यादी महिला एच. ए कॉलनीतून जात असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने नेम चुकल्याने महिला त्यातून बचावल्या. याप्रकरणी मंचरकर याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंचरकर हे गवळी माथा येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कर्मचा-यांनी सापळा रचून मंचरकरला गवळीमाथा येथून अटक केली आहे.