धक्कादायक! दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या तरुणीवर गॅंगरेप करून विष पाजून फेकलं, अखेर…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/rape-11.jpg)
धुळे: दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या 20 वर्षीय तरुणीवर 3 नराधमांनी सामूहिक बलात्कार केलेला आहे. एवढं करून नराधम थांबलेले नाहीत. त्यांनी पीडितेला बळजबरीनं विष पाजून फेकून दिलं आहे. अखेर पीडितेचा धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मृत्यू झालेला आहे.
दोन दिवसांपूर्वी पीडितेवर पारोळा (जि. जळगाव) तालुक्यातील टोळी गावात सामूहिक अत्याचार करण्यात आलेला होता. नराधमांनी तिला विष पाजून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला होता. नंतर पीडितेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र, उपचारादरम्यान पीडितेनं अखेरचा श्वास घेतला आहे. खान्देशात महिला सुरक्षित आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रावेर येथील तीन मुलीच्या खुनाचे प्रकरण ताजं असताना आत दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
पीडीत तरुणीला उचलून नेत तिच्यावर तीन जणांनी सामूहिक अत्याचार करून तिला विष पाजून पारोळा शहरात फेकून दिल्याचा आरोप मयत पीडित तरुणीच्या आईनं केला आहे. यात एका अज्ञात महिलेचाही समावेश असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, सर्व आरोपीना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी पवित्रा घेतला आहे. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीडितेच्या आईनं केली आहे. तसेच पीडितेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणातील एक संशयित देखील रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.