मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/local-train.jpg)
मुंबई – मध्य रेल्वे, मुंबई विभाग दि. ८.११.२०२० रोजी विविध अभियांत्रिकी वदेखभाल कामांसाठी आपल्या उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक चालविणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा ठाणे आणि कल्याणस्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व ठाणे तेकल्याण दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील.
कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९ पर्यंत सुटणाऱ्या जलदमार्गावरील सेवा कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावरवळविण्यात येतील. या सेवा कल्याण ते ठाणे दरम्यानच्या सर्वस्थानकांवर थांबून पुढे मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येती ल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी३.३९ या वेळेत सुटणाऱ्या बेलापूर / पनवेल / वाशीसाठीच्या डाउन हार्बरमार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बरमार्गावरील सेवा रद्द राहतील.
तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कुर्लाआणि वाशी-पनवेल विभागात विशेष गाड्या चालविण्यात येतील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० या वेळेत ट्रान्सहार्बर लाइन /मेन लाइन मार्गे प्रवास करण्याची परवानगी राहील.