Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
भाजपा खासदार साक्षी महाराज यांना कोरोना व्हायरसची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/sakshi-maharaj.jpg)
उन्नाव- उत्तर प्रदेशातील उन्नावचे भाजपा खासदार साक्षी महाराज यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. साक्षी महाराज यांनी स्वतःच सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे.
साक्षी महाराज यांनी सांगितले की त्यांना कोरोनाची काही लक्षणे जाणवू लागली ज्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी केली जी पॉझिटिव्ह आली आहे. जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहनही साक्षी महाराज यांनी केले आहे. कोरोनाची बाधा झाल्याने ते होमक्वारंटाइन असणार आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात 23 हजार 132 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत 4 लाख 63 हजार 240 जण कोरोनामुक्तही झाले आहेत. तर कोरोनामुळे उत्तर प्रदेशात सात हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.