Breaking-newsराष्ट्रिय

उत्तरप्रदेशात बस उलटून 17 ठार

मैनपुरी – उत्तरप्रदेशात मैनपुरी-इटावा रोडवर एक प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 17 जण ठार झाले तर अन्य 20 जण जखमी झाले. ही बस जयपुरहून फारूकाबादला जात होती. वाटेत मैनपुरी-इटावा रस्त्यावर पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमाराला रस्ता दुभाजकला धडकून उलटली. बस मध्ये 60 ते 70 प्रवासी होते. त्यातील 17 जण ठार झाले असून अन्य 20 जण जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये बस चालकाचाही समावेश असून त्याचा डावा पाय मोडला आहे. जखमींना सैफई आणि मैनपुरीतील रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.ही खासगी बस होती व बसमधील बहुतेक जण विट भट्टीवर काम करणारे कामगार होते. बस फारूखाबाद मधील खासगी कंपनीची आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button