Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरोनावर मात केल्यानंतर भाजपच्या या नेत्याचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/jagannath-dhone.jpg)
अकोला: भारतीय जनता पक्षाचे आणि माळी समाजाचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांचं सोमवारी रात्री ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालेले आहे. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी 12.30 वाजता पातूर येथील डॉ. वंदनताई जगन्नाथराराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जगन्नाथ ढोणे हे एम. एस. सर्जन होते. त्यांनी डॉक्टरकीसह राजकारणातही आपला ठसा उमटवलेला होता. डॉ. जगन्नाथ ढोणे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेली होती. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आलेले होते. उपचाराअंती ढोणे यांनी कोरोनावर मात मिळविलेली होती.