लोकप्रियतेसाठी मी घोषणा करणार नाही, जे करु ते ठोस आणि ठाम करु – मुख्यमंत्री
![8 hours duty of women police; Big decision of the state government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/udhav.jpg)
उस्मानाबाद । जे करु ते ठोस आणि ठाम करु. सरकार मदतीसाठी वचनबद्ध आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मदत कशी करायची यावर चर्चा सुरु आहे. मदत कशी करायची यावर आज-उद्या ठोस निर्णय घेतला जातला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत दिले.
आज उद्या मंत्रिमंडळाची बैठक होईल, पंचनामे होत आले आहेत, लवकरच मदत मिळेल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आज दिले. लोकप्रियतेसाठी मी घोषणा करणार नाही, मी दिलासा द्यायला आलोय आधार द्यायला आलोय असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा करणे टाळले. मुख्यमंत्री आज उस्मानाबादमध्ये दौरा करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तुळजापूर तालुक्यातील काटगावमधील पूरग्रस्तांना धीर दिला. काळजी करु नका हे तुमचे सरकार आहे. मदतीचे वचन देतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.
जिवीत हानी कमी कमी होईल, याकडे लक्ष देणे मदत करणार आहोत. मुंबईत काम सुरु आहे. बहुतेक पंचनामे पूर्ण होत आले आहे. थिल्लर चिल्लर लोकांकडे बघयाला मला वेळ नाही, असा टोला त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. जे करायचे ते व्यवस्थित करायचं. जे करु ते ठोस करु. सणसुदीच्या दिवसात जनतेच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. सगळ्या गोष्टीचे सोंग आणता येत पैसे नाही. केंद्राची येणी आहेत. ती वेळेवर आली असती तर लगेच मदत करता आली असती. जीएसटीचे पैसे केंद्र सरकारकडून आलेले नाहीत.
दरम्यान, केळी उत्पादकांना पीक विम्याच्या निकषांमुळे लाभ मिळत नसल्याबद्दल मुख्यमंत्री लिहिणार केंद्राला पत्र पाठवणार आहेत. केळी पिकासाठी लागू केलेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांना लाभ न मिळता विमा कंपन्यांना फायदा होणार आहे या तक्रारींची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी विभागाने तातडीने संबंधित पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून निकष तसेच नुकसानभरपाई संदर्भात मार्ग काढण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे केंद्राला पत्र देखील लिहिणार आहेत.