Jio च्या या ३ प्लानमध्ये रोज मिळणार ३ जीबी डेटा, फ्री कॉलिंग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/reliance-jio-rs49-rs-69-recharge-plans.jpg)
नवी दिल्ली – टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ च्या पोर्टफोलियोत एका पेक्षा एक जबरदस्त प्लान आहेत. कंपनी फ्री कॉलिंग आणि डेली डेटाचे अनेक प्लान्स ऑफर करीत आहे. युजर्स अनेकवेळा अशाच प्लानच्या शोधात असतात. ज्यात अधिक डेटा आणि फ्री कॉलिंग सोबत अन्य बेनिफिट्स मिळतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या तीन जबरदस्त प्लान्स संदर्भात या ठिकाणी खास माहिती देत आहोत. ज्यात रोज ३ जीबी डेटा सोबत फ्री कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळतो.
जिओचा ४०१ रुपयांचा प्लान
२८ दिवसांची वैधता असलेला या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा सोबत वैधता पिरियड साठी ६ जीबी एक्स्ट्रा डेटा सुद्धा मिळतो. या हिशोबाप्रमाणे या प्लानमध्ये ९० जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये जिओ नेटवर्क्ससाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळते. तर अन्य नेटवर्क्सवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये १ हजार मिनिट्स मिळतात. प्लानच्या सब्सक्रायबर्सला एका वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
जिओचा ३४९ रुपयांचा प्लान
रोज ३ जीबी डेटा या प्लानमध्ये मिळतो. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये जिओ तेच जिओ अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळते. ४०१ रुपयांच्या प्लानप्रमाणे यात अन्य दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंग साठी १ हजार मिनिट्स दिले जातात. प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते. रोज १०० फ्री एसएमएस दिले जाते.
जिओचा ९९९ रुपयांचा प्लान
जिओच्या या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता आहे. रोज ३ जीबी डेटा ऑफर केले जाते. प्लानमध्ये सब्सक्रायबर्स जिओ नंबरवर अनलिमिटेड वर कॉल करण्यासाठी प्लानमध्ये ३ हजार फ्री एसएमएस सोबत या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.