कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे श्रीकरवीरनिवासिनी दर्शन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/IMG-20201018-WA0008.jpg)
कोल्हापूर – नवरात्री २०२० सालच्या नवरात्रोत्सवामध्ये करवीरनिवासिनीचे करवीरमाहात्म्यातील निवडक स्तोत्रांमधून होणारे दर्शन ही संकल्पना आज राबविली आहे. सर्वच स्तोत्रांमधून श्रीकरवीरनिवासिनीचे व्यापक आणि आदिशक्ति स्वरूपच वारंवार प्रगट होताना दिसते. कधी ती शिवाचे संहारकार्य करताना दिसते, तर कधी ब्रह्माचे निर्माणकार्यही करताना दिसते, तर कधी विष्णुचे पालनकार्यही तीच करते. ब्रह्मा विष्णु – शिवाची ती जननीही आहे आणि आत्मशक्तिही.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/img-20201018-wa00053428443643319296088.jpg)
महाशक्तिची करवीरमाहात्म्यातील निवडक स्तोत्रे मुळ संस्कृत संहिता आणि त्यांची मराठी आवृती, या निमित्ताने जगदंबेच्या भक्तांपर्यंत पोहोचणार आहेत. द्वितीयेला करवीरनिवासिनीची ‘पराशरांना महाविष्णुस्वरुपात दर्शन’ रूपात पूजा. द्वितीयेला करवीरनिवासिनी ही पराशरांना महाविष्णुस्वरुपात दर्शन देताना विराजमान झालेली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/img-20201018-wa00066619823392421810419.jpg)
याची पार्श्वभूमी अशी की, श्रीमहालक्ष्मी जेव्हा घोर तप करणाऱ्या पराशरांना महाविष्णुस्वरूपात दर्शन देते तेव्हा त्यांचा सर्व संशय, भेदभाव फिटतो व ते महालक्ष्मीला विष्णुस्वरुपिणी जाणून तिच्यापुढे नतमस्तक होतात व सर्व संशय हरण करणाऱ्या अष्टकाने स्तुती करतात.