पावसामुळे खंडीत झालेला वीज पूरवठा पुन्हा पुर्ववत सुरु
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/748177-power2.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पुण्यासह पिंपरी चिंचवड शहराला बुधवारी पावसाने चांगलेच झोडपले. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला. तर काही ठिकाणचा वीज पुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आला. त्यामुळे दोन्ही शहरातील ३१० रोहित्रांचा पुरवठा विस्कळीत झाला. यातील ९५ टक्के वीज पुरवठा गुरुवारी सकाळी पर्यंत पूर्ववत करण्यात यश आले.
मुसळधार पावसाने धानोरी, नगररस्ता, लोहगाव, वडगावशेरी, विमाननगर, कोंढवा, रास्तापेठ, वानवडी, फातिमानगर, मंगळवार पेठ, एनआयबीएम रोड, वारजेचा काही भाग, सिंहगड रोड, धायरी, शिवणे, धायरी, मार्केटयार्ड, बिबवेवाडी, आंबेगाव, कात्रज, सहकारनगर, पर्वती, पेशवे पार्क, स्वारगेट, हडपसर, हांडेवाडी, पिसोळी, पंचवटी, पाषाण, खराळवाडी, पिंपळे सौदागर, जुनी सांगवी, ताथवडे, पिंपळे सौदागर, देहू रोड, चऱ्होली, रावेत, चिखली, थेरगाव, दापोडी, हिंजवडी परिसरातील झाडे व मोठ्या फांद्या वीजयंत्रणेवर पडल्याने तसेच पावसाचे पाणी साचल्याने वीजयंत्रणेत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला.
अनेक सोसायट्यांमध्ये तसेच फिडर पिलरमध्ये पाणी साचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून काही रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. या सर्व भागातील बहुतांश वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तर वीजपुरवठ्यासंबंधी ग्राहकांच्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे कामे सुरु असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.