चांदोली अभयारण्यग्रस्त प्रकल्पग्रस्तांना ४ कोटी १९ लाख रुपयांचा रखडलेला उदरनिर्वाह त्याचे वाटप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Chandoli.jpg)
मुंबई | कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीन जिल्हयात येणाऱ्या चांदोली अभयारण्यग्रस्त १८ वसाहतीतील ५३७ प्रकल्पग्रस्तांना ४ कोटी १९ लाख रुपयांचा रखडलेला उदरनिर्वाह भत्ता काल (४ ऑक्टोबर) प्रातिनिधिक स्वरूपात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाटप केला. जिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समस्या निवारण सप्ताह आयोजित करावा असे निर्देश यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान रोजंदारीवर जाऊन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला आता दिलासा मिळेल याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. मागील भाजप सरकारच्या काळात आम्ही अनेकदा मागणी करूनही निधी मिळाला नव्हता मात्र राज्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी स्थापित झालेल्या महाविकासआघाडी सरकारने हा प्रश्न प्राथमिकतेने मार्गी लावला याचा आनंद होतोय असे मंत्री जयंत पाटील म्हणाले.