Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
राष्ट्रपती कोविंद यांचा ७५ वा वाढदिवस, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/kovind-modi.jpg)
नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज ७५ वा वाढदिवस . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी उत्तम आरोग्य लाभो अशा सदिच्छाही पंतप्रधानांना व्यक्त केली आहे. राष्ट्रपती कोविंद यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४५ ला उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील एका गावात झाला. कोविंद हे २५ जुलै २०१७ रोजी देशाचे १४ वे राष्ट्रपती बनले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत राष्ट्रपतींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘राष्ट्रपतींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. वंचितांप्रति त्यांचा सेवाभाव मोठा आहे. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देवो.’