Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
राम मंदिर प्रकरणात मोदींनी काहीही केले नाही- खासदार सुब्रह्मण्यम स्वामी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Subramanian-Swamy.jpeg)
नवी दिल्ली: राम मंदिर प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काहीही योगदान नाहीये. राम मंदिराचे पहिले श्रेय जाते माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना. त्यानंतर मग इतरांचे योगदान येते आहे. परंतू, पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिर प्रकरणात कोणतीही महत्त्वाची भूमिका बजावलेली नाही, अशा शब्दात ज्येष्ठ खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिलेला आहे.