आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त
नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे आज भारतात पेट्रोल ९ पैसे लिटर, तर डिझेल ११ पैसे लिटरने स्वस्त झाले आहे. बर्याच दिवसांनी पेट्रोल आणि डिझेल अशाप्रकारे एकाचवेळी स्वस्त झाले आहे.
राजधानी दिल्लीत पेट्रोल ९ पैसे लिटर स्वस्त झाल्यामुळे येथे पेट्रोलचा भाव ८१ रुपये ९९ पैसे होता, तर डिझेल ११ पैशांनी स्वस्त झाल्याने ते ७३ रुपये ५ पैसे लिटर होते. मुंबईतही पेट्रोलच्या दरात ९ पैशांची घसरण झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ८८ रुपये ६४ पैसे झाले आहे. डिझेलच्या दरातही १२ पैशांची घट झाल्यामुळे डिझेल ७९ रुपये ५७ पैसे लिटर झाले आहे. तर कोलकात्यात पेट्रोलच्या दरात ८ पैसे आणि डिझेलच्या दरात ११ पैशांची घसरण झाली आहे.तसेच चेन्नईत पेट्रोल ८ पैसे लिटर आणि डिझेल १० पैसे लिटर, तर बेंगळुरूत पेट्रोल ९ पैसे लिटर आणि डिझेल १२ पैसे लिटरने स्वस्त झाले आहे.