मोदी सरकारने सरकारी बँका विकू नयेत : राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Tapase.jpg)
मुंबई । प्रतिनिधी
पीएसयू बँकांचे आधीच विलिनीकरण करून ही संख्या दहावर आणल्यानंतर आता भाजपचा डोळा ६ प्रमुख पीएसयू बँकाच्या निर्गुंतवणुकीकरणावर आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था देण्याचे आश्वासन आणि स्वप्न दाखविणारी भाजप सरकार आता देशाची संपत्तीचा लिलाव करीत आहे. ही राष्ट्र संपत्ती अनेक वर्षांच्या मेहनतीमुळे निर्माण झाली आहे आणि अजूनही बहुसंख्य ठेवीदारांचा सरकारी बँकांवर विश्वास आहे असेही महेश तपासे म्हणाले.
नोटबंदीचा चुकलेला निर्णय आणि जीएसटीची नियोजन शून्य अंमलबजावणीमुळे आपली अर्थव्यवस्था उध्वस्त झाली आणि आता कोरोना साथीने त्याला पार खोलवर गाढून टाकले आहे. बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचे परिणाम आता सर्वांनाच जाणवत आहे. रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकास यासारख्या मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भाजप सरकारने भावनिक विषयांवर आपली भूमिका बजावल्या आहेत असाही आरोप महेश तपासे यांनी केला आहे.