#Coronavirus: जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा तब्बल 2.56 कोटींच्या पार; एकूण 855,444 रुग्णांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/oron.jpg)
पुणे: कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरातील अनेक देश त्रस्त आहेत. कोरोना बाधितांचा वाढता आकडा आणि मृतांची संख्या दिवसागणित वाढत चालला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 2.56 कोटींच्या पार गेलेला असून 855,000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
बुधवार सकाळपर्यंत जगभऱातील कोरोना बाधितांची संख्या 25,660,482 इतकी होती. तर मृतांचा आकडा 855,444 वर पोहचला होता. अशी माहिती माहिती युनिर्व्हिटी सेंटर फॉर सिस्टम आणि सायन्सकडून देण्यात आलेली आहे. CSSE च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील कोरोना बाधितांचा आकडा 6,073,174 वर पोहचला आहे. तर 184,644 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सुरुवातीपासून कोरोना बाधितांच्या संख्येत अग्रस्थानी असलेली अमेरिका अद्याप प्रथमस्थानी आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत ब्राझील दुसऱ्या स्थानी असून देशात 3,950,931 कोरोना रुग्ण आहेत. तर 122,596 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.