Breaking-newsराष्ट्रिय

देशात २४ तासांत तब्बल ७८ हजार ३५७ नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली – भारतात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाल्याची स्थिती आहे. दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांमध्ये मंगळवारी दिलासादायक घट झाली होती. मात्र मागील २४ तासांत देशात ७८ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर चिंताजनक बाब म्हणजे मृतांची संख्याही एक हजारांपेक्षा जास्त आहे.

मागील २४ तासांत देशात एकूण ७८ हजार ३५७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. तर याच कालावधीत १ हजार ५४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३७ लाख ६९ हजार ५२४ वर पोहोचली आहे. तर कोरोनाबळींचा आकडा ६६ हजार ३३३ इतका झाला आहे. दरम्यान, देशात सध्या ८ लाख १ हजार २८२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर २९ लाख १ हजार ९०९ जण कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतले आहेत.

देशात गेल्या काही दिवसांपासून दररोज ७५ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळतात. मंगळवारी या रुग्णवाढीला काहीसा ब्रेक लागला. नव्याने आढळून आलेल्या रुग्णसंख्येत आणि मृतांच्या आकड्यात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. काल ६९ हजार ९२१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, तर ८१९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज मात्र नव्या रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वरच्या दिशेला वळला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button